महानगरपालिका सदस्यांमधून महानगरपलिकेने निवडलेला महापौर हा समाजाचा, नागरी एकतेचा मूर्तिमंत प्रतिक आहे. महापौर पदाचा मोठा आदर केला जातो. महापौर पदावरील व्यक्ती वादग्रस्त कृतीपासून अलिप्त असते. यशस्वी महापौरांची मूळ पात्रता महणजे त्यांना पक्षीय भेदाभेद न करता मिळविलेली किर्ती. त्यांना कामकाज सुरळीत आणि नियमानुसार चालविणयाकरिता याची अत्यंत आवश्यकता आहे. महापौर कर्यलायाच्या प्रत्यक्ष कामाचा प्रभाव सर्वसाधारणपणे, मनपाच्या राजकारणावर आणि धोरणवर पडतो. महापौरांचे व्यक्तीमत्व आणि स्वभाव,त्यांची राजकीय पार्श्वभूमी आणि त्यांच्या कार्यालयाची प्रतिष्ठा त्यांना धोरणत्मक निर्णय घेण्यास त्याचबरोबर सभागृहाचे कामकाजावर विशेष प्रभाव पाडण्यास पाठबळ देतात.

भारतासारख्या लोकशाही देशात, महापौर हे विविधातेतून एकतेचे प्रतिक आहेत. महापौरांच्या दोन प्रमुख भूमिका आहेत. शहराची प्रतिष्ठा अबाधित ठेवणे आणि महानगरपालिकेच्या सभांचे अध्यक्षीय धुरा बाळगण्यासाठी कार्यकारी भूमिका पार पाडणे. महानगरपालिका सभांचा अध्यक्ष म्हणून त्यांना सभागृहाच्या चोहोकडे लक्ष द्यावे लागते. शोभेची भूमिका त्यांना शहराबाहेर आणि जगातील अनेक देशांच्या विविधा भागात पार पाडावी लागते. जेव्हा जेव्हा परदेशी प्रतिष्ठीत किंवा अतिविशेष व्यक्ती या शहारस भेटी देतात तेव्हा राज्यसरकारच्या आमंत्रणावरुन नागरिकांच्या वतीने पाहुण्यांच्या आदरसत्काराकरिता त्यांना काम करावे लागते. हे आपण पाहतोच. त्याचबरोबर एखाद्या देशाचा राजा, राष्ट्रपती किंवा पंतप्रधान यांचा महापौर नागरी सत्कार करतात किंवा त्यांना नागरी मानपत्र देतात, तेव्हा सदर सत्कार किंवा मानपत्र हे बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबईचे नागरिक यांच्या नावे दिला जातो. अशा प्रसंगी महापौर हे प्रथम नागरिक असल्याचे दिसून येते. नागरी, शासकीय इतर सामाजिक कार्यक्रमामध्ये महापौरांना प्रतिष्ठेचे पददेखील दिले जाते.

बृहन्मुंबई महानगपालिकेचया विस्तृत इतिहासाच्या क्षितीजावर नजर टाकली असता महापौर पदावर आरुढ झालेल अनेक स्वयंप्रकाशित व्यक्तीमत्व निदर्शनास येतात. यापैकी अनेक मोठया यशस्वी राजकारणाचे द्योतकच आहेत.महापौर हे केवळ समारंभाचे प्रमुख पाहुणे नसून विस्तृत प्रमाणात आर्थिक शक्ती असलेल महानगरपालिकेचे वैधानिक प्राधिकारी आहेत.

महापौरांना एक वर्षाऐवजी अडीच वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे.