"The SRM e-tendering will not be available to MCGM users from 9:00 P.M. to 7 A.M."
  प्रशासकीय कक्ष  
 
 
 

महापालिका आयुक्त
शतकापासून मुंबईमध्ये विकसित झालेल्या रचनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महानगरपालिका आयुक्त हे सर्वात महत्वाचे पद आहे. मु.म.न.पा. अधिनियमांतर्गत हे एक प्राधिकारी आहेत. महाराष्ट्र शासनामार्फत मु.म.न.पा. अधिनियमाच्या कलम 54 अंतर्गत त्यांची नेमणूक केली जाते. पाणी पुरवठा, रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, नाले यासारख्या शहाराच्या विविध संरचनांच्या परिरक्षण आणि मुंबईच्या नागरिकांस कार्यक्षमतेने विविध सेवा देणे ही त्यांची जबाबदारी आहे.
       त्यांना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, महानगरपालिका उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि विविध खात्यांचे प्रमुख कार्य पार पाउण्यासाठी मदत करीत असतात.
महापालिका आयुक्तांचे तपशील

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक महाराष्ट्र शासनामार्फत मु.म.न.पा. अधिनियमाच्या कलम 54 अंतर्गत केली जाते. महानगरपालिका आयुक्तांनी त्यांना नेमून दिलेल्या खात्यांकरिता आयुक्त म्हणून काम करावे लागते. सद्यस्थितीत चार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आहेत.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तपशील

महानगरपालिका उपायुक्त
महानगरपालिका उपायुक्तांची नेमणूक मु.म.न.पा. अधिनियमाच्या विविध कलमांतर्गत महानगरपालिका आयुक्त/अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांना आपले जबाबदा-या पार पाडण्यासाठी सहाय्य म्हणून केली जाते. त्यांची नेमणूक महाराष्ट्र शासनाच्या संमतीने महानगरपालिकेमार्फत केली जाते.
महानगरपालिका उपायुक्तांची यादी

सहाय्यक आयुक्त
सहाय्यक आयुक्त हे विभागाचे प्रशासकिय प्रमुख असून नागरिकांना दिवसेदिवस देण्यात येणा-या सुविधामध्ये त्यांची महत्वपर्ण भूमिका असते. हे शहर 24 प्रशासकिय विभागांमध्ये विभागले असून प्रत्येक विभागात सहाय्यक आयुक्त (पूर्वी विभाग अधिकारी म्हणून माहित असलेले ) प्रमुख असतात. त्यांची नेमणूक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिफारशीवर महानगरपालिका करते.
सहाय्यक आयुक्त यांची यादी

महापालिकेची खाती
प्रत्येक खात्यामध्ये महानगरपालिकेने नेमणूक केलेले खाते प्रमुख असतात.
खाते प्रमुखांची यादी

 

 
 
 

संकेतस्थळ मार्गदर्शिका | संपर्क | गोपनियता | डिस्क्लेमर
Technical support by ABM Knowledgeware Ltd.
This site is best viewed in 1024x768 resolution using Microsoft Internet Explorer 6.0 SP 2 and higher. In other browser the view may look distorted."