"The SRM e-tendering will not be available to MCGM users from 9:00 P.M. to 7 A.M." **
  करमणुकीच्या व इतर सुविधा  
 
 
 
राजा डॉ. बलदेवदास बिर्ला क्रीडा केंद्र : चौपाटी येथे असलेल्या या केद्रातील वातानुकूलीत प्रेक्षागार, अन्य सभागृहे व बगीचा या जागा भाडयाने वापरावयास मिळू शकतात. या रंगमंदिरात 625 प्रेक्षकांची बसण्याची सोय आहे. त्या बाबतच्या अटी व शर्ती तिथल्या व्यवस्थापकांकडे उपलब्ध आहेत. ( दू. क्र. 23685587, 23670135) (क्रीडा केंद्र सध्या दुरुस्तीसाठी बंद) gardenवीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय: नागरिकांकरिता बुधवार खेरीज दररोज सकाळी 9.00 ते 6.00 पर्यंत उघडे असते. या ठिकाणी असलेल्या रोपवाटिकांतील रोपे बुधवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीखेरीज सकाळी 8.00 ते 11.00 व दुपारी 3.00 ते 5.00 या वेळांमध्ये विकत मिळू शकतात. अधिक माहितीकरिता उद्यान अधीक्षक, वीरमाता जिजाबाई& भोसले उद्यान, भायखळा, मुंबई -400 027 (दू. ध्व. 23725799) यांच्याशी संपर्क साधावादीनानाथ मंगेशकर नाट्यगृह: नटवर्य दत्ता भट मार्ग, विलेपार्ले (पूर्व) येथे असलेले हे महापालिका नाट्यगृह संपूर्णपणे वातानुकूलित असून तेथे 916 खुर्च्यांची सोय आहे. नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम वगैरेकरिता अनुसूचित भाडे व अनामत रक्कम भरून हे नाट्यगृह आरक्षित करता येते. नाट्यगृह आरक्षित करण्याबाबतची संपूर्ण माहिती व्यवस्थापकांकडे दूरध्वनी क्र. 26184027 वर मिळू शकते. नाटक व इतर कार्यक्रमांच्या माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 26125568 वर संपर्क साधावाप्रबोधनकार ठाकरे रंगमंच: आचार्य दोंदे मार्ग, शिवडी येथे असलेला रंगमंच सर्व साधनसामुग्रीने युक्त असून खुल्या मैदानात प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. लग्न समारंभासाठी सभागृह आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाही येथे उपलब्ध आहे. अभ्यासिकेसाठी प्रति विद्यार्थी रु. 5/- प्रवेश फी आणि रु. 12/- वार्षिक शुल्क (दरमहा रु. 1/-) आकारले जाते. सदर रंगमंच नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आरक्षित करता येतो. (दूरध्वनी क्र. 24135154) gardenस्वरसम्राट कुंदनलाल सेहगल खुले नाट्यगृह: गोशाला लेन, दप्तरी रस्ता, मालाड (पूर्व), मुंबई 400 097. येथे असून हे नाट्यगृह चित्रपट, नाटक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, सभा यासाठी भाड्याने दिले जाते. येथील सभागृह लग्न, धार्मिक समारंभाकरिता नाटकाच्या सरावाकरिता वगैरे साठी मिळू शकते. अधिक तपशील नाट्यगृह व्यवस्थापकांकडे मिळू शकेल. (दू. ध्व. 28834871)प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यमंदिर संकुल:

Details of activities

महात्मा गांधी स्मारक ऑलिंपिक जलतरण तलाव

कोठेः स्वातंत्र्य वीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर.

सुविधाः जलतरणाव्यतिरिक्त उपहारगृह आणि क्रिडांगण सुविधाही उपलब्ध आहे.

संपर्कः 24452062.जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव

कोठेः शरदभाऊ आचार्य मार्ग, नटराज सिनेमाजवळ, चेंबुर

सुविधाः उपहारगृह सुविधा उपलब्ध आहे.

संपर्कः 25286962.सरदार वल्लभभाई पटेल जलतरण तलाव

कोठेः महात्मा गांधी मार्ग, कांदिवली (प.)

सुविधाः उपहारगृह, क्रिडांगण उपलब्ध आहे.

संपर्कः 28014427.


घाटकोपर लायन्स महानगरपालिका जलतरण तलाव

कोठेः घाटकोपर (पू.)

सुविधाः जलतरणाव्यतिरिक्त उपहारगृह आणि क्रिडांगण सुविधाही उपलब्ध आहे.

संपर्कः 25125952.


निरलॉन आलिंपिक महानगरपालिका जलतरण तलाव

कोठेः सिद्धार्थ नगर गोरेगाव (प)

सुविधाः ह्या जलतरण तलावाची व्यवस्था आणि परिरक्षण मेसर्स प्रबोधन गोरेगाव यांच्याकडे गेल्या 2003 पासून 30 वर्षाकरिता भाडेतत्वावर सोपविणयात आली आहे

संपर्कः 28834871.वैतरणा विश्रामधाम: मुंबईपासून 129 कि.मी. (80 मैल) अंतरावर असलेल्या वैतरणा तलावाजवळील महापालिकेची विश्रामधामे ठराविक शुल्क भरून रहावयास मिळतात. तिथे मोटारीने जावयाचे असल्यास मुंबई - आग्रा रस्त्याने आणि रेल्वेने जावयाचे असल्यास मध्य रेल्वेने खर्डी येथे उतरावे लागते. खर्डी ते वैतरणा हे अंतर 16 कि. मी. (10.5 मैल) असून एस. टी. बसने वैतरणा येथे जाता येते. (महानगरपालिका सदस्य, महानगरपालिका अधिकाऱयांना तसेच इतर नागरिकांना येथे रहाण्याचे परवाने देणे सध्या बंद आहे.) gardenबी. ई. एस. टी. ची विशेष सुविधा: उपक्रम कोणत्याही सहलीचे आयोजन करीत नाही. उपक्रमातर्फे रविवार व सुट्टीच्या दिवशी सायंकाळी सांताक्रूझ स्टेशन व दहिसर पुलावरुन जुहू बीच करिता जादा बसेस सोडण्यात येतात. पावसाळ्यात ही सेवा बंद असते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (म.प.वि.म.) दर शनिवारी, रविवारी व सुट्टीच्या दिवशी दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणाऱया सहलीचे आयोजन केलेले आहे. यासाठी उपक्रमाच्या छत नसलेल्या उघड्या बसगाड्या वापरण्यात येतात. त्यांचे आरक्षण म. प. वि. म. च्या मंत्रालयानजिकच्या कार्यालयातून होते. पावसाळ्यात ही सेवा बंद असते.महापालिका जलतरण तलाव: महापालिका जलतरण तलावात पुरुष, महिला तसेच नैमित्तिक पोहणाऱयांना दिवसाच्या वेगवेगळ्या ठराविक वेळी शुल्क भरुन पोहता येते. नव्याने पोहावयास शिकणाऱयांनाही ठराविक आकार देऊन शिकविण्याची सोय केली आहे. याबाबतची अधिक चौकशी जलतरण तलावाच्या व्यवस्थापकांकडे करावी. पालिका जलतरण तलाव पुढीलप्रमाणे


  1. महात्मा गांधी स्मारक जलतरण तलाव: ,स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर, मुंबई - 400 028. (दू. ध्व. 24452062)
  2. सरदार पटेल महानगरपालिका जलतरण तलाव: महात्मा गांधी मार्ग, कांदिवली (प.) मुंबई - 400 067. (दू. ध्व. 28014427) तलावाच्या आवारातील प्रितमलाल पारेख खुले सभागृह विहित अनुसूचीत शुल्क घेऊन लग्नादी समारंभास दिले जाते.
  3. घाटकोपर लायन्स महानगरपालिका जलतरण तलाव: ,घाटकोपर (पूर्व), मुंबई - 400 077 (दू. ध्व. 25125152)
  4. निरलॉन ऑलिंपिक महापालिका जलतरण तलाव: ,सिद्धार्थ नगर, गोरेगांव (प.) मुंबई - 400 062. (दू. ध्व. 28721882)
  5. जनरल अरुणकुमार वैद्य जलतरण तलाव: , शरदभाऊ आचार्य मार्ग, नटराज सिनेमाजवळ, चेंबूर, मुंबई - 400 071. (दू. ध्व. 25286962)
  6. प्रियदर्शनी क्रीडा संकुल: मुलुंड (प.), मुंबई - 400 080, (दू. ध्व. 25909787, 25612722)
  7. शहाजी राजे क्रीडा संकुल: अंधेरी (प.), मुंबई - 400 053. (दू. ध्व. 26744292/3263/4266) येथील जलतरण तलाव 'बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान' या संस्थेस व्यवस्थापन व पर्यवेक्षणासाठी दिलेले आहेत.

  8.      पहिल्या 2 तलावांच्या आवारातील मैदाने नियत शुल्क घेऊन सार्वजनिक समारंभास भाड्याने दिल्या जातात. 12 वर्षापर्यंत शालेय विद्यार्थ्यांना महापालिकेच्या कर्मचाऱयाने शुल्कामध्ये 50ज्ञ् सवलत दिली जाते.


बृहन्मुंबई महानगरपालिका क्रीडा भवन: बृहन्मुंबई महानगरपालिका क्रीडा भवन तर्फे क्रीडा भवनाच्या मुख्य कार्यालयात (दू. ध्व. क्र. 22090979, 22075897) तसेच शिवाजी पार्क येथील (दू. ध्व. क्र. 24451216) शाखेत लॉन टेनिस, बॅडमिंट्न, टेबल टेनिस, कॅरम तसेच लग्न सुविधेसाठी जागा, नाममात्र शुल्क आकारुन उपलब्ध करुन देण्यात येते..

 

 
 
 

संकेतस्थळ मार्गदर्शिका | संपर्क | गोपनियता | डिस्क्लेमर
Technical support by ABM Knowledgeware Ltd.
This site is best viewed in 1024x768 resolution using Microsoft Internet Explorer 6.0 SP 2 and higher. In other browser the view may look distorted."